शुक्रवार, २९ मे, २०२०

मा.श्री व्यंकटेश चौधरी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी व मा.श्री व्यंकट गंदपवाड केंद्र प्रमुख यांच्या प्रेरणेतून मुलांमध्य व पलकांमध्ये अभ्यासाची वृत्ती निर्माण झाली आहे.

    _*यशोगाथा -learning from home*_

*वडिलांच्या आत्महत्येनंतरही शिवराज घेतोय आईच्या मदतीने learning from homeचे धडे*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपूर केंद्र वाजेगाव ता. नांदेड येथील १ली ते ५वी  या शाळेत learning from home हा उपक्रम यशस्वीतेसाठी कृती आराखडा तयार करून शाळेतील पालकांचे  वर्गनिहागट तयार करून ५५पालकांना सहभागी करून विविध माध्यमाद्वारे मोबाईल व t v व रेडिओच्या द्वारे अभ्यास दिला व सराव घेतला जात आहे.
  विशेष म्हणजे शिवराज वामनराव खांडेकर हा विद्यार्थी इ ४थीतील असून त्याच्या वडिलांनी दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली. तो व आई रेणुकाबाई व लहान बहीण असाच त्यांचा छोटा परिवार... त्यास गेल्या वर्षी सेवाभावी संस्थेकडून शैक्षणिक साहित्यासाठी मदत करण्यात आली. त्यामुळे त्याला शिक्षणात आवड निर्माण झाली व आई रेणुकाबाईने या लाॕकडाऊन काळात घरीच असल्यामुळे दररोज एका तरुणाच्या मदतीने शिवराजच घरीच अभ्यास घेत आहे. नांदेड शहरालगत आसलेल्या वीटभट्टी व इतर लघु उद्योगावर काम करणारे असे अनेक कुटुंबातील विद्यार्थी या उपक्रमशील शाळेत learning from home च्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. उपक्रमशील मुख्याध्यापक बशिर पठाण व सहशिक्षिका सौ सपना शिंदे यांनी आपल्या अथक परिश्रमातून ही शाळा अल्पावधीतच उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपास आणली आहे. या शाळेस तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी श्री अशोक काकडे, शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर, गटशिक्षणाधिकारी श्री रुस्तुम आडे यांनी भेट देऊन अभिनंदन केले.
या शाळेच्या प्रगतीसाठी उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी श्री व्यंकटेश चौधरी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली ही शाळा यशोशिखराकडे वाटचाल करीत आहे. मी केंद्रप्रमुख म्हणून प्रशासक, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांचा समन्वय साधून "learning from home"ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे राबवत आहे.
   यात गावातील सरपंच, शाळा व्यस्थापन समिती व विशेषतः ३५ सुशिक्षित तरुण यांचे मोलचे सहकार्य मिळत आहे.

*केंद्रप्रमुख
व्यंकट गंदपवाड
केंद्र वाजेगाव ता नांदेड जि नांदेड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा