बुधवार, १० जून, २०२०









 मिशन स्काॅलरशिप अंतर्गत जि प प्रा शा वडगाव येथील शिष्यवृत्ती सराव शिबीर वाजेगाव विभागास
 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगारानी आंबुलगेकर यांची भेट


   नांदेड न्यूज : मिशन स्काॅलरशिप अंतर्गत जि प प्रा शा वडगाव येथाला शिष्यवृत्ती सराव शिबीर वाजेगाव विभागास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगारानी आंबुलगेकर यांनी भेट देवून सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांंना वहीपेन देवून अभिनंदन केले..
         मुलांच्या आवडीनुसार,त्यांना ज्यात गती आहे,ज्याकडे मुलांचा कल आहे अशा क्षेत्रात त्यांना पाठवण्याकडे पालकांनी लक्ष द्यावे.पालकांनी मुलांचा कल लक्षात घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. वाजेगाव केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे सुरू असलेल्या मिशन स्कॉलरशिप सराव शिबिरात त्या बोलत होत्या.
"पालकांनी मुलांचा कल लक्षात घ्यावा "- जि. प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर 







     वाजेगाव केंद्र अंतर्गत सुरू असलेला मिशन स्कॉलरशिप सराव शिबिर हा अत्यंत उपयुक्त व अभिनंदनीय उपक्रम आहे.शहरातील मुलांच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी त्यांना उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधांमुळे मागे राहतात.त्यांना शहरातील मुलांप्रमाणे शिकवणी वर्ग,परीक्षांचा भरपूर सराव,आधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षण या गोष्टी अभावानेच मिळतात.परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या सुविधा या शिबिरातून उपलब्ध करून देणारे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी आणि कार्यतत्पर केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड या दोघांचेही करावे तितके कौतुक कमीच आहे.यांच्या पुढाकारातून आयोजित अशा शिबिरातून तज्ज्ञ शिक्षकांकडून केले जाणारे मार्गदर्शन,घेतला जाणारा स्पर्धा परीक्षांचा सराव यातून निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल.मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेची विद्यार्थिनी आहे,त्यामुळे मला माझ्या सर्व शिक्षकांच्या गुणवत्तेवर विश्वास आहे.त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून त्यांना गुणवंत बनवावे,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
           यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्यंकट गंदपवाड यांनी वाजेगाव बीट हे चौधरी साहेबांच्या मार्गदर्शन खाली शंभर टक्के डिजिटल झाले असून या बीट मध्ये वाटर बेल,बालसभा,अक्षर रांगोळी यासारखे राज्यभर अनुकरण केलेले उपक्रम राबविले जातात.मुलांना शंभर टक्के प्रगत बनविणे आमचे ध्येय असून त्यासाठी सर्व शिक्षक मेहनत घेतात असे प्रतिपादन केले.
          याप्रसंगी दत्तुअन्ना झरेवाड,वडगाव चे सरपंच नामदेव पुयड,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर पुयड,केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाढे,वडगाव शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम जाधव,हणमंत तिडके,लता शिवाजी,रत्नमाला काटकर,माधव कल्हाळे,भारत देशमुख,रामराव देशमुख, आदी उपस्थित होते.
          या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक सारंग स्वामी,मंकोड,जगजीत ठाकूर,रुपेश गादेवाड,रामेश्वर आळंदे,श्रीराम मोगले,विजय गादेवार,अक्षय ढोके,पौर्णिमा अंकमवार,सूमैया खुटानबुजे,अश्विनी गोडीगवार,उषा एडके आदी शिक्षक मार्गदर्शन करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा