सोमवार, १५ जून, २०२०

शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप


शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला


वाजेगाव (तालुका नांदेड):15 जून( 2020-21) शैक्षणिक सत्राच्या प्रारंभाचा दिवस. प्रतिवर्षी शाळारंभ हा उपक्रम राबवून नव्या विद्यार्थ्यांचे मोठ्या जोमाने स्वागत करण्यात येते. शिक्षक विद्यार्थी पालक हे एकत्रित येऊन शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहाने सुरुवात केला जातो. मात्र कोरोना संकटामुळे हे चिमुकले विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. परंतु त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाकडून मिळालेली मोफत पाठ्यपुस्तके मुलांपर्यंत पोहोचवावी त्या भूमिकेतून वाजेगाव शिक्षण विभागातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाच्या बाबतीतील सर्व बाबींची दक्षता घेऊन घरपोच पाठ्यपुस्तके देण्यात आली.




            आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी ,केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी विभागातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन कोरोना बाबतीत सर्व दक्षता घेण्याची सूचना दिली आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पाठ्यपुस्तके त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी घरोघरी जाऊन पाठ्यपुस्तके मुलांच्या हातात दिली. तर काही पालकांना देण्यात आली. शाळा नसली तरी नवीकोरी पुस्तके पाहून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
                या बैठकीस केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाडे पदोन्नत मुख्याध्यापक सटवाजी माचनवार आणि सर्व मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फिरोज शेख यांच्यासह बिटमधील शिक्षकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा