सोमवार, १५ जून, २०२०

केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांच्याकडून वाढदिवसानिमित्त शाळेला सॅनिटायझर वाटप

                नांदेड (१५जून): कोरोना संकटातही शाळा नाही पण शिक्षण चालू हा उपक्रम प्रभावीपणे राबवणारे उपक्रमशील केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी वाढदिवसानिमित्त वाजेगाव शिक्षण विभागातील शाळा निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचे मोफत वाटप करून आपली शैक्षणिक बांधिलकी जपली आहे.



शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकारातून वाजेगाव शिक्षण विभागात सातत्याने विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात.  गेल्या वर्षी याच विभागाचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विभागातील सर्व विद्यार्थ्यांंना पाणी बॉटल वाटप करून एक नवा पायंडा पाडला होता. हाच आदर्श समोर ठेवत  विभागातील इतर सर्व शिक्षकांनी व पालक विद्यार्थ्यानी पण आपल्या वाढदिवसानिमित्त पाणी बॉटल आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले. यामुळे वाजेगाव बिट मधील जिल्हा परिषद शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना पाणी बॉटल उपलब्ध झाल्या आणि त्याचा उपयोग वॉटर बेल उपक्रमात झाला. केरळच्या धर्तीवर वॉटर बेल उपक्रम राबवणारे वाजेगाव हे महाराष्ट्रातील पहिले बिट होते.
           आज शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी  कोरोना संकटात शिक्षक व विद्यार्यांना सुरक्षित राहण्याच्या सजग दृष्टिकोनातून केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या हस्ते विभागातील सर्व  जिल्हा परिषद शाळांना सॅनिटायझरचे वाटप केले.
             यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाढे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फेरोज शेख, पदोन्नत मुख्याध्यापक सटवाजी माचनवार, तुकाराम रेनकुंटवार, यशवंत सोनकांबळे, बशिर पठाण, हणमंत तिडके, मनीषा माळवतकर, संगीता कदम, लक्ष्मीबाई गायकवाड, बालाजी कपाळे, माधव कल्हाळे, बाबुराव सूर्यवंशी, रूपेश गाडेवाड, सारंग स्वामी, अक्षय ढोके, साधना बेंद्रे, जगजित ठाकूर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा