बुधवार, ८ जुलै, २०२०

"शिक्षकांनी पाण्यातील नितळी प्रमाणे कार्य करावे", शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी.


"शिक्षकांनी पाण्यातील नितळी प्रमाणे कार्य करावे ",शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी.

         जि प वाजेगाव भागातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक  जि प प्रा शा वाडीपुयड येथे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या उपस्थित घेण्यात आली.
         सदरील बैठक कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी व तसेच लर्निंग फ्रॉम होम हा उपक्रम अधिक यशस्वी व प्रभावीपणे राबवण्यासाठी विभागातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.



       



          या बैठकीत केंद्रप्रमुख व्यंकटकट गंदपवाड यांनी वरील विषयाच्या अनुषंगाने शाळापूर्व तयारी व या काळात विद्यार्थ्यांपर्यंत पोचून त्यांना अध्यापनात सहभागी करून मुलांना पाठ्यपुस्तके घरपोच देऊन शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत व गावातील नागरिकांचा सहभाग व तसेच तरुण युवकांचा सहभाग घेऊन learning from home ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी  शाळा स्तरावर शाळा बंद राहणार नाही व शिक्षण चालू राहील यासाठी वर्गनिहाय व विषय निहाय  व्हाट्सअप ग्रुप तयार करून व तसेच त्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन व सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन व तसेच  त्यांना पालकांना कोरोनाच्या काळात  कशाप्रकारे अभ्यास करावा याबाबत प्रत्येक शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी व पालक यांच्याशी संपर्क अथवा प्रत्यक्ष भेट घेऊन प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधावा व आठवड्यातून दोन दिवस प्रत्येक शिक्षकाने उपस्थिती  दिवसभर उपस्थित राहून अभ्यास व गृहपाठ द्यावा व तपासून योग्य ते मार्गदर्शन करावे यासाठी मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर नियोजन करावी व तसेच माहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शाळा निर्जंतुकीकरण व स्वच्छता राखावी व आरोग्य विभागाच्या वतीने शिक्षकांनी व मुख्याध्यापक त्यांनी आरोग्याधिकारी यांची प्रमाणपत्र सादर करावे व तसेच शाळेतील  शौचालय स्वच्छ करावी व हँडवॉश स्टेशन  उभारावे यासह योग्य ती खबरदारी घ्यावी  अशी सूचना केंद्रप्रमुख वेंकट गंदपवाड यांनी सदरील बैठकीत दिली यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी मुख्याध्यापक शिक्षकांनी पाण्यातील नितळी प्रमाणे पाणी स्वच्छ करण्याचे कार्य करावे. ज्याप्रमाणे नितळी  पाणी स्वच्छ करते त्याप्रमाणे शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी  शैक्षणिक गुणवत्ता वाढूवून  गढूळपणा दूर करावा. असे मनोगत व्यक्त करत कोरोना संकट काळात शिक्षकांनी शैक्षणिक वारकरी व्हावे, असे म्हणाले. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाढे, विभागातील मुख्याध्यापिकाक  संगीता कदम, बेबीसरोजा परबत, लक्ष्मी गायकवाड, मनीषा माळवतकर, बशीर पठाण, संगमेश्वर पांचाळ, हनुमंत तिडके, निलेश सूर्यवंशी, दत्तप्रसाद पांडागळे, सहशिक्षक सायलू मंकोड, विजय गादेवार, सारंग स्वामी, मुदस्सर अहमद, श्रीराम मोगले आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा