रविवार, ५ जुलै, २०२०

यशवंत सोनकांबळे व गोदावरी तोटवाड यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप



यशवंत सोनकांबळे व गोदावरी तोटवाड यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

  नांदेड : शिक्षण क्षेत्रात शिक्षक ते मुख्याध्यापक पदाची जबाबदारी उत्तमपणे सेवा बजावत ३० जून रोजी वाडीपुयड येथील उपक्रमशील मुख्याध्यापक यशवंत सोनकांबळे सेवानिवृत्त झाले. तसेच मे महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या इंजेगाव प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गोदावरी तोटावाड यांना वाजेगाव शिक्षण विभागाच्या वतीने निरोप देण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना चौधरी म्हणाले, यशवंतराव म्हणजे वक्तशीरपणा विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक. त्यांनी कधी खुर्चीत बसून अध्यापन केलेले पाहिले नाही. शाळेत ते दररोज सकाळी ९ वाजता उपस्थित राहायचे व मुलांमध्ये रममाण होऊन जायचे. त्यांनी मुलांसाठी राबवलेला बचत बॅंक हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हा उपक्रम यशवंत विद्यार्थी बचत बँक या नावाने विभागातील सर्व शाळांनी राबवावा असे मत व्यक्त केले.









            केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी, यशवंतराव हे उपक्रमशील मुख्याध्यापक होते. त्यांनी मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून शाळेत राणी लक्ष्मीबाई विद्यार्थी बचत बैंक चालवली. याचे सर्व अद्यावत रिकॉर्ड त्यांनी शाळेत ठेवले आहे. हे सर्व ते विद्यार्थ्याकडून करुन घेतात. असे विविध उपक्रम त्यांनी आपल्या सेवाकाळात राबवले.  पूर्ण सेवा बजावल्यानंतरही विद्यार्थ्यांंची नाळ तुटणार नाही याची काळजी तोटवाड मैडमनी घेतली आहे. हा आदर्श निश्चितच आपल्यासाठी प्रेरणा देणारा आहे. त्यांचा आदर्श कायम पुढे ठेवण्याचा निर्धार करत सरांच्या नावे विभागातील सर्व शाळेत "यशवंत विद्यार्थी बचत बैंक" या नावाने पुढे चालवणार असल्याचे मत व्यक्त केले.
                गोदावरी तोटवाड म्हणाल्या, शिक्षक ते मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळताना मी आदिवासी दुर्गम भागात सेवा बजावली. आपल्या पूर्ण सेवेत प्राथमिक शाळेत काम करताना कधीही मी नकारात्मक विचार केला नाही व मी महिला आहे म्हणून कधी सहानुभूतीची अपेक्षा केली नाही. हा सेवापूर्ती निरोप घेताना मला खूप प्रेरणा मिळाली असून, हीच प्रेरणा पुढे  मी 'बाल संस्कार केंद्रा'च्या माध्यमातून चालू ठेवणार आहे, असा आदर्श संकल्प त्यांनी आज केला. याप्रसंगी विभागातील मुख्याध्यापिका संगीता कदम, बेबीसरोजा परबत, लक्ष्मी गायकवाड, मनीषा माळवतकर, बशिर पठाण, संगमनाथ पांचाळ, हणमंत तिडके,  निलेश सूर्यवंशी, सहशिक्षक सायलू मंकोड, विजय गादेवार, सारंग स्वामी , मुदस्सर अहमद, श्रीरामे मोगले , श्रीमती एस एस पत्की आदिजण उपस्थित होते. 
                प्रास्ताविक नूतन मुख्याध्यापक दत्तप्रसाद पांडागळे यांनी केले. सूत्रसंचालन विजय गादेवार यांनी केले तर आभार मेघा पोलावार यांनी मानले.

   

                    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा