रविवार, २१ जून, २०२०

मुलांनो ( विद्यार्थ्यांनो ) मला तुमची आठवण येते.....



I miss you students......

The sound of school bell,
is the song of liveliness
The silence in shrieking around
O' naughty playground ,
I really miss you....
The smile that sparking
on every face,
the deep chorous of assembly
That prayer and humbly heads bowed,
it's a soulful experience,
I miss you.....
The glittering eyes and
glaring smiles,
asking questions and writing answers,
Singing songs,fighting and everything,
Learning a new lesson
while teaching you,
I miss you.....
It's all stunned as if an evil power said, 'statue'
that's a strange picture of mute.
But  I'm hopeful as someone told me,
'The spring in human life never stops!'
I know very soon I teach you the poem,
'Students are going to school'
Because I really miss you students.....
    
         Yedke Usha Nivruttirao
               Z.P.C.P.S. Wajegaon
                        Nanded.
मुलांनो ( विद्यार्थ्यांनो ) मला तुमची आठवण येते...

शाळेच्या घंटेचा नाद म्हणजे
चैतन्याचे संगीत आहे.
सभोवतीच्या गोंगाटाची शांतता बाळगणार्‍या हे खोडकर खेळाच्या मैदाना.....
मला खरचं तुझी आठवण येते.
सर्वांच्या चेहर्‍यावरील चमकणारे स्मित, परिपाठाचे धीरगंभीर स्वर,
ती प्रार्थना आणि नम्रपणे झुकलेली मस्तके.....
हा अगदी आत्मीय अनुभव,
मला तुझी आठवण येते.....
डोळ्यातील तेज, गालातील उत्साही स्मित
प्रश्न विचारणे आणि उत्तरे देणे, गाणी गाणे,खोड्या करणे,
अगदी सर्व काही
तुम्हाला शिकवताना मीच नवा
धडा शिकणे
मला तुमची आठवण येते.......
हे सर्व  स्तब्ध झाले आहे.
जणू कोण्या दुष्ट शक्तीने (निसर्गाला)
'थांबा' म्हटले आहे.
हे अगदी विचित्र मौनचित्र आहे
पण, मी आशावादी आहे.
कारण मला कुणीतरी सांगितले आहे
' माणसातील वसंत नाहीच घेत उसंत कधी !'
मला माहीत आहे,अगदी लवकरच मी तुम्हाला 'मुले (विद्यार्थी ) शाळेला जात आहेत.' ही कविता शिकवेल.
कारण खरचं मुलांनो मला तुमची आठवण येते...........

                       सौ. उषा निवृत्तीराव एडके
               जि. प. के. प्रा. शाळा वाजेगाव
                                नांदेड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा